चालत्या दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप!!!

0
387
जामखेड न्युज – – – – 
 एक युवक मोटार सायकलवरून जात असताना अचानक चालू मोटार सायकलवर बिबट्याने झडप मारून त्यास जखमी केले असल्याची भयानक घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे घडली आहे.या हल्ल्यात संकेत सारंगधर झुराळे हा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संकेत झुराळे हा कामानिमित्त घरून संध्याकाळी सातच्या दरम्यान राजू शिंदे यांच्याबरोबर दिघीचारी रोडने जात असताना
अचानक झाडा आडून बिबट्याने संकेतच्या मोटार सायकलवर झडप घेत त्याला जखमी केले. सुदैवाने त्याच्या मागे असणार्‍या शिंदेच्या गाडीच्या उजेडात बिबट्या पळून गेला. शिंदे यांनी त्याला गाडी काढून चालू करायला सांगत ते घटनास्थळावरून सुरक्षीत ठिकाणी आले. त्यानंतर संकेत यास श्रीरामपूरच्या साखर कामगार येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान उपचारासाठी आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने त्याला नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. या दरम्यान वनाधिकार्‍यांना याबाबत माहीती दिली असता आम्ही सिव्हीलला फोन करून सांगतो म्हणत ताबडतोब उपचारासाठी संकेतला घेऊन जाण्यास सांगीतले. परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरीत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here