मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांविरोधात गुन्हा दाखल

0
217
जामखेड न्युज – – – – 
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांविरोधात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मिलिंद एकबोटेने विविध समाज माध्यमावर सुनियोजित कट रचून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे मजूकर असलेले संदेश, व्हिडिओ आणि निमंत्रणपत्रिका या सोशल मीडियावर व्हायरल केले व सर्व हिंदू धर्मिय लोकान पवळे चौकात एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानंतर तिथे महाआरती देखील करण्यात आली. तसेच, कार्यक्रमस्थळी वाटप केलेल्या पुस्तिकेमध्ये येथील विवादित ठिकाणी न्यायालयाची स्थगिती असून कोणत्याही प्रकारची बांधकामं चालू नसताना, तिथे काम सुरू असल्याबाबत दिशाभूल आणि द्वेष निर्माण करणारी पत्रके छापण्यात आल्याचे आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फरासखाना पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here