जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळ तसेच दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय जामखेड व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘निर्भय कन्या अभियाना’ अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन केले होते. पहिले व्याख्यान प्रा. उकिर्डे चंद्रकांत यांनी ‘महिलांचा व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर गुगल मीटद्वारे दिले. मानसिक विकास आणि व्यक्तिमत्व विकास यांचा परस्पर संबंध आहे असे प्रा. उकिर्डे यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून आपला सर्वांगीण विकास करावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुनील नरके यांनी भूषवले.विद्यार्थ्यांनींनी आपला व्यक्तिमत्व विकास करून आपले करिअर करावे असे सांगितलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पेटकर योगेश यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मस्के गौरव यांनी केले. प्रा. देशमुख ऋषिकेश यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.
दुसरे व्याख्यान सौ.मनीषा पुराणे यांनी ‘महिलांचा सामाजिक आणि कौटुंबिक सुसंवाद’ या विषयावर दिले. विद्यार्थिनींनी आपल्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर कौटुंबिक सुसंवाद साधण्याचे कौशल्य संपादन करावे. तसेच सामाजिक बांधिलकी राखून आपला व्यक्तिमत्व विकास करावा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. देशपांडे मॅडम या होत्या. मुलींनी कौटुंबिक व सामाजिक बांधिलकी ठेवून आपला व्यक्तिमत्व विकास करावा असे सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक मस्के गौरव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. साबळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात एन.सी.सी. अधिकारी डॉ. केळकर गौतम,प्रा. मोहळकर सुनील, डॉ. गोपाल जाधव, प्रा. पठाण अकबर, प्रा. अश्विनी गायकवाड, सय्यद मॅडम, प्रा. ठोंबरे एस. प्रा. नितीन राऊत, प्रा. काशीद राजेश, श्री. अनिकेत देशमुख आणि मोठ्या प्रमाणात मुलींनी सक्रिय सहभाग घेतला.
तिसरे व्याख्यान व प्रात्यक्षिके प्रा. म्हेत्रे राजू देविदास यांनी दिले. तसेच सेल्फ डिफेन्सचे प्रात्यक्षिके दाखवून व फिजिकल फिटनेस याबदल व्याख्यान दिले. झुम्बा डान्स च्या माध्यमातून मुलींना शारीरिक शिक्षणाचे धडे दिले. रुद्रा पेटकर या मुलीने लाठी चालवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घोगरदरे तुकाराम यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. मधुकर राळेभात यांनी भूषविले. अध्यक्षीय समारोपात बोलताना ते म्हणाले की मुलीने सेल्फ डिफेन्स चे धडे घेऊन त्याचा वापर आपल्या जीवनात करावा असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. गाडेकर एस. एन. यांनी केले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रम नियोजनासाठी कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. सुनील नरके आणि गणित विभागाचे प्रमुख डॉ. सुनील पुराणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील एन.एस. एस., एन. सी. सी, सांस्कृतिक विभाग व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा समावेश होता.








