Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडचे आजी माजी गटशिक्षणाधिकारी झाले शिक्षणाधिकारी

जामखेडचे आजी माजी गटशिक्षणाधिकारी झाले शिक्षणाधिकारी

0
278
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
    जामखेड येथे सध्या कार्यरत असलेले गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे हे बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी तर पाच वर्षांपूर्वी असलेले गटशिक्षणाधिकारी पोपट काळे हे पुणे महानगर पालिकेत शिक्षणाधिकारी झाले आहेत. दोन्ही अधिकार्‍यांची ओळख एक हुशार अधिकारी म्हणून आहे.
   बीडचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे
      अत्यंत हुशार व कार्यकुशल अधिकारी म्हणून शिंदे यांची ओळख आहे. अगदी प्राथमिक शिक्षक पदापासून ते शिक्षणाधिकारी पदापर्यंत ते कष्टाने गेलेले आहेत जामखेड तालुक्यात शिक्षक म्हणून 15 वर्षे  सेवा केली तसेच
शिक्षण विस्तारअधिकारी 5 वर्षे तर गटशिक्षणाधिकारी म्हणून बीड जिल्ह्य़ातील गेवराई, अंबाजोगाई नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, जामखेड येथे 11 वर्षे सेवा केली सध्या ते जामखेड येथेच गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते आता त्यांची बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
   पुणे मनपाचे शिक्षणाधिकारी पोपट काळे
 प्रचंड इच्छाशक्ती असलेले अधिकारी जामखेड तालुक्यात असताना लोकांमध्ये मिळून मिसळून काम केल्यामुळे  २ कोटी ७ लाख १३ हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून भौतिक सुविधा उपलब्ध करून ८४ जिल्हा परिषदेच्या शाळा आयएसओ करून इंग्रजी शाळा ओस पाडल्या शैक्षणिक दृष्ट्या मागास तालुक्याची ओळख पुसून  महाराष्ट्रातील आयएसओ तालुका म्हणून ओळख निर्माण केली यासाठी तत्कालीन पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरुमकर व गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी प्रयत्न करून तालुक्यात एक शैक्षणिक क्रांती केली होती.
     जामखेड तालुका हा नगर जिल्ह्य़ातील सर्वात लहान तालुका व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. तसा शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखला जात होता. २०१२ मध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉ. भगवान मुरुमकर विराजमान झाले व २०१५ मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून पोपट काळे हजर झाले. तालुक्याची शैक्षणिक दृष्ट्या मागास ही ओळख पुसण्यासाठी  मुरुमकर व काळे झपाटून कामाला लागले. पक्षभेद व मतभेद विसरून गावोगावी जाऊन लोकांचे मेळावे घेऊन शाळेसाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन केले यास भरभरून प्रतिसाद मिळत गेला व  २ कोटी ७ लाख १३ हजार रुपये लोकवर्गणी गोळा झाली. यातून संरक्षण भिंत, बसण्यासाठी बाकडे, शाळेची रंग लंगोटी, बोलक्या भिंती, डिजिटल शाळा, पंखे, ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती केली, शाळा परिसर स्वच्छ केला, परिसरात वृक्षारोपण केले यामुळे ८४ शाळा आयएसओ शाळा झाल्या यामुळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढली व इंग्रजी शाळा ओस पडल्या वाढीव पटामुळे शिक्षक संख्या वाढली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात लहान तालुका महाराष्ट्रात शैक्षणिक दृष्टीने सर्वात प्रगत व आयएसओ शाळांचा तालुका झळकत आहे. याचे सर्व श्रेय डॉ. मुरुमकर व काळे यांनाच जाते.
    जिल्हा परिषदेची शाळा म्हणले की नाक मुरडणारा पालक आता प्राधान्याने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहे. १८० शाळांपैकी ८४ शाळा आयएसओ झाल्या होत्या
   नागनाथ शिंदे व पोपट काळे हे दोन्ही जामखेड पंचायत समितीचे आजी माजी गटशिक्षणाधिकारी आहेत आता दोन्ही अधिकारी शिक्षणाधिकारी झाले आहेत जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षणाप्रेमी मंडळींनी दोन्ही अधिकार्‍यांना फोनद्वारे, प्रत्यक्षात भेटून, सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!