Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये शिवजयंतीनिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

जामखेडमध्ये शिवजयंतीनिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

0
354
जामखेड प्रतिनिधी 
                   जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
  राजमाता जिजाऊ मुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यामुळेच परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आरोग्य, सामाजिक, प्रशासकीय, खेळ, वक्तृत्व, स्वच्छता यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच मोठय़ा उत्साहात
प्रथमच महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार तर प्रमुख पाहुण्या म्हणून सिनेतारका व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद या होत्या. रोहिणी संजय काशिद यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सौ. मीना अविनाश बेलेकर सौ. राधिका अमोल फुटाणे ज्योती गणेश राऊत सौ. आरती सुरज काळे सौ. शितल गणेश काळे सौ. रासकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन दिपाली भोसले सोनाली भोसले
यांनी केले.
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये प्रथमच महिलांनी  अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार तर प्रमुख पाहुण्या म्हणून सिनेतारका व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद होत्या
छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून गणेश आरती व शस्त्र पुजन करत लाठी काठी महिला शस्त्र पथक दांडपट्टा व तलवार रोप मल्लखांब शिवचरित्रावर आधारित नृत्य करत मुलींच्या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिक करत मिरवणूक संविधान चौकात येऊन त्या ठिकाणी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
         सकाळी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शहरप्रमुख गणेश काळे, उपप्रमुख अवि बेलेकर, डॉ. प्रताप चौरे, नगरसेवक बिभिषण धनवडे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रा. लक्ष्मण ढेपे, संजय बेलेकर, डॉ. अविनाश पवार, प्रहार तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, चंदन अंधारे, सागर गुंदेचा, सुरज काळे, चंद्रकांत गोरे, दिपक सुरसे, प्रा. युवराज भोसले, ज्ञानेश्वर कोळेकर, लहू शिंदे, विजय काशिद, पप्पू काशिद, आण्णा काशिद, श्यामभाऊ शिंदे, मोहनभाऊ ढाळे, कृषी अधिकारी नितीन शिंदे, पांडुरंग क्षीरसागर, किरण मुळे, नाना रासकर, गणेश राळेभात, दत्ता काळे, संतोष घोलप, अशोक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवसभरात सुमारे १२५ बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
        सायंकाळी भव्य मिरवणूक सोहळा झाल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना योद्धा शोभा ताई आरोळे संचालिका सीआरएचपी
ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड 
ज्योतीताई बेल्हेकर 
महिला व बालकल्याण अधिकारी जामखेड 
कु शिवानी विष्णुपंत पन्हाळकर
एमडी अनेस्थेशिया
आरोग्य सेविका म्हणून 
अलका बेलेकर, शारदा संजय बेलेकर (आरोग्य सेविका)
उषा अशोक राळेभात (मदतनिस सेविका)
उर्मिला लक्ष्‍मण खेत्रे मदतनीस सेविका
सुरेखा अनिल सदाफुले( अंगणवाडी सेविका)
सुमन विश्वंभर जगदाले (अंगनवाडी सेविका)
जयश्री पृकाश जगदा(मदतनिस सेविका)
सुनिता विषणू केवडे(अंगनवाडी सेविका  
अल्का रमेश ससाने (स्वछता दूत) छबाबाई पांडुरंग कांबळे (स्वछता दूत) मंदा किसान मोरे शालन बाप्पू डाडर, सारिका अजय गौड आशा वर्कर सपना विजय गौड अंगणवाडीसेविका, पुष्पा विजय बेलेकर अंगणवाडी सेविका अर्चना दत्ता केवड़े, अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी बचत गट,  आशा वर्कर स्वाती सचिन भदर्गे, सविता अनिल वीर, सुरेखा अशोक वीर, साक्षी रामचंद्र भोसले (बॉक्सिंग अँड कुस्ती) दीक्षा शाम पंडित राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन, वैष्णवी महादेव पवार (राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वूशो कराटे)
    दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून भगवे फेटे परिधान करून भव्य दिव्य अशी डोळ्याचे पारणे फेडणारी मिरवणूक निघाली यात पालखी, राजमाता जिजाऊच्या वेषात घोड्यावर बसलेली महिला, मुलींचे मर्दानी खेळ सादर करण्यात आले यात मोठय़ा संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता. जामखेडच्या इतिहासात प्रथमच महिलांनी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य मिरवणूक व परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!