जामखेड न्युज – – – –
झिक्री सेवा संस्थेच्या निवडणुकीत आ. रोहीत पवार यांच्या शेतकरी विकास मंडळाने सर्व १२ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे. सदर निवडणुक मतपत्रिका घेऊन झाली परंतु एकही मत बाद झाले नाही. तालुक्यातील सर्व ४७ सेवा संस्थेची निवडणूक चालू असून यापूर्वी दोन सेवा संस्थेची निवडणुक बिनविरोध झाली होती व आ. रोहीत पवार यांच्या मंडळाने जिंकल्या होत्या आता तिसरी झिक्री सेवा संस्थेची निवडणुक एकतर्फी जिंकून आ. रोहीत पवार यांनी सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे.
तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली झिक्री सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी दोन मंडळ निवडणूक लढवत होते. १३ जागे पैकी भटके विमुक्त जागेसाठी उमेदवार न मिळाल्याने ती जागा रिक्त ठेवण्यात आली. तर महिला राखीव मधील दोन्ही जागा शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामुळे १० जागेसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते ४ या वेळात मतदान घेण्यात आले. १६८ मतदानापैकी १६१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सव्वाचार मतमोजणी केंद्रात मतमोजणी घेण्यात आली. आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला १०० च्या पुढे मते पडली तर विरोधी उमेदवारांना ५० ते ६० च्या आसपास मते पडली.
झिक्री सेवा संस्थेच्या निवडणुकीत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ अशोक मधुकर जगताप, सचिन रामभाऊ साळुंके, श्रीधर रावण जिवडे, अशोक बलभीम साळुंके, बाबासाहेब दगडू इथापे, रामदास दादा भावरे, विजय रामचंद्र काशीद, सर्जेराव किसन कसाब
महीला राखीव – जयश्री संजय साळुंके, शिलावती आबासाहेब साळुंके
अनुसूचित जाती जमाती – मधुकर नामदेव सकट, इतर मागासवर्गीय – बाळू भगवान उबाळे
सहायक निबंधक देवीदास घोडेचोर यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक निर्णय अधिकारी निलेशकुमार मुंढे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब चव्हाण कामकाज पाहिले. निवडणूक निकाल जाहीर करताच विजयी उमेदवारांची घोषणा करताच शेतकरी मंडळाच्या उमेदवारांनी फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाल उधळून व घोषणा देऊन विजयोत्सव साजरा केला.
आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वा खालील रत्नापूर, अरणगाव सेवा संस्थेची निवडणूक आठ दिवसापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या आता झिक्री सेवा संस्थेच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवून सहकारात दमदार इंन्ट्री केली आहे.