आमदार रोहित पवारांचा दिव्यागांना मदतीचा हात – मतदारसंघातच दिव्यांग तपासणी शिबीर

0
329
जामखेड न्युज – – – – 
आपल्या मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार रोहित पवार हे कायमच प्रयत्नशील असतात. त्याचाच प्रत्यय आता मतदारसंघातील दिव्यांगांना आल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेतली. या दिव्यांगांच्या सोयीसाठी मतदारसंघात कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर यांच्या माध्यमातून दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
                        ADVERTISEMENT
     या शिबिराला मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तींनी प्रतिसाद दिला. या शिबिराचा लाभ ४०० हून अधिक दिव्यांगांनी घेतला. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण ते प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांना अनेकदा जिल्ह्याच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात, यामुळे त्यांच्यावर येणारा मानसिक व आर्थिक ताण कमी करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांना नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येतील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विविध शिबिरांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेसाठी आमदार रोहित पवार हे कायम सर्व अडचणी व गैरसोयी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच अशा प्रकारचे शिबिर येत्याकाळात जामखेडमध्ये सुद्धा घेण्यात येणार आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातच आमदार स्वतः या सर्व गोष्टींकडे लक्ष देत असल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रिया – 
फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गावा-गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचत असतो. आरोग्याचे वेगवेगळे विषय आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राचा, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आपल्या तालुक्यात आणून दिव्यांग व्यक्तींचा येण्या-जाण्याचा खर्च व गैरसोय कमी करून आम्ही तालुक्यामध्ये त्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारच्या मदतीने करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here