Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचा ल. ना. होशिंग विद्यालयात सत्कार संपन्न

शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचा ल. ना. होशिंग विद्यालयात सत्कार संपन्न

0
294
जामखेड न्युज – – – 
शिक्षक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, डायट कॉलेजवर अधिव्याख्याता, यवतमाळ, नाशिक व नगरला शिक्षणाधिकारी आणि पुणे विभागात शिक्षण उपसंचालक पदावर काम केले आता ते शिक्षण संचालक असलेले दिनकरराव टेमकर यांनी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर प्रेरणादायी प्रवास केलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असा त्यांचा प्रवास आहे. ते जामखेड येथे आले असता ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी होते. यावेळी सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य शांताराम पारखे, तालुका माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष प्रवीण गायकवाड, योगशिक्षक बाळासाहेब पारखे, रामचंद्र होशिंग भाऊसाहेब, कला शिक्षक मुकुंद राऊत, एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, अर्जुन रासकर, विशाल पोले, अविनाश नवगिरे, प्रमोद बारवकर, संजय सरडे, प्रवीण कुलकर्णी इत्यादी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
      त्यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रामीण भागातील युवक शिक्षक पदापासून सुरुवात करून खडतर परिश्रम घेऊन शिक्षण संचालक पदापर्यंत पोहोचतो हे उत्तम कष्टाचे व प्रामाणिकपणाचं उदाहरण होय. साहेब शिक्षण संचालक या पदापर्यंत पोहोचताना साहेबांनी सगळ्यांशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवून अथक परिश्रम,जिद्द, चिकाटी,व्यासंगी बहुश्रुता, निर्गवी वृत्ती,मनमिळावू स्वभाव, सर्वांशी सतत स्नेहभाव ठेवत  अनेक जणांना उत्तम मार्गदर्शन व प्रेरणा नेहमीच दिली आहे.
आदरणीय संचालक दिनकरराव टेमकर यांनीही आपल्या मनोगतामध्ये जामखेड तालुक्यात काम करत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांनी विद्यार्थी केंद्रित  ठेवून प्रामाणिक पणे कार्य करावे हे सांगितले.
    दिनकरराव टेमकर यांचा प्रवास
 दिनकर टेमकर यांनी सुरुवातीला शिक्षक, मुख्याध्यापक, भोकर (जि. नांदेड), जामखेडला गटशिक्षणाधिकारी, संगमनेर डायट कॉलेजवर अधिव्याख्याता, यवतमाळ, नाशिक व नगरला शिक्षणाधिकारी आणि पुणे विभागात शिक्षण उपसंचालक पदावर काम केले आता ते शिक्षण संचालक आहेत.
     प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. नगर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व संघटनांना विश्वासात घेऊन अनेक उपक्रम राबवले. सेमी इंग्रजी, लोकवर्गणीतून डिजिटल स्कूल, शालेय परिसराचा  विकास अशा अनेक प्रकल्पांतून त्यांनी जिल्हा परिषद शाळांना नवी ओळख निर्माण करून दिली. राज्यात पटपडताळणीनंतर अनेक जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त होत होते. टेमकर यांनी मात्र वर्षभर अगोदरच पडपडताळणी केल्यामुळे जिल्ह्यात एकही शिक्षक अतिरिक्त शिक्षक होऊ शकला नाही. टेमकर यांच्या कार्यकाळात तत्कालिन उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, उमेश डोंगरे या त्रिमूर्तींनी राबविलेले अनेक शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने स्वीकारले. टेमकर यांची वरिष्ठ पदावर निवड झाल्यामुळे त्यांना काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!