आमदार रोहित पवारांना रमाई रत्न पुरस्कार प्रदान

0
383
जामखेड न्युज – – – – – 
 महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारा ‘रमाई रत्न पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयमाला कदम व आमदार रोहित पवार यांना
देण्यात आला सन्मानचिन्ह, भारतीय संविधानाची प्रत, तिरंगी शाल व बोधिवृक्ष, असे या पुरस्काराचे स्वरूप होते
 आमदार रोहित पवारांच्या राजकीय कार्याबरोबरच सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे फक्त कर्जत-जामखेड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमदार रोहित पवारांचे सामाजिक कार्य बारामती अॅग्रोच्या व सृजन फौंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
उदगीर येथे झालेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते आज सोमवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजता महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात वितरण सोहळा झाला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, तर स्वागताध्यक्षस्थानी नगरसेविका लता राजगुरू होत्या
 विशेष अतिथी म्हणून राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे व आंबेडकर चळवळीतील सर्व पक्षप्रमुख यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here