जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडीच्या पर्यटन विकासानंतर स्थानिकांना रोजगाराच्या संधी व तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होईल. आमदार रोहित पवारांच्या सतत प्रयत्नांमुळे चौंडी येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा व त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला पर्यटनाच्या माध्यमातून होईल या उद्देशाने आ. रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. सध्या सीना नदीचे खोलीकरण केल्यानंतर पर्यटक काही प्रमाणात वाढले आहेत. तसेच चौंडी येथे विविध भागातून नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे. आता आणखी निधी मंजूर झाल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याने मतदारसंघातील नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट…
आधीच्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील अनेक मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, काही गोष्टींचं फक्त त्यांनी राजकारण केलं. लोकांचं हित लक्षात घेऊन परिसरातील विविध विकासकामांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. त्यासोबतच चौंडीपर्यंत जाणारा मुख्य मार्ग आता राज्य महामार्ग करण्यात आला असून त्यालासुद्धा भरघोस निधी माझ्या माध्यमातून देण्यात आला आहे.
आ. रोहित पवार-





