मराठी संदर्भात आपलेच दुटप्पी वर्तन आहे – डॉ सुधाकर शेलार

0
224
जामखेड प्रतिनिधी 
                 जामखेड न्युज – – – – – 
खरे तर आपल्यामुळेच महाराष्ट्रात मराठी भाषेची दुरावस्था होत आहे.भाषिक प्रश्नांबाबत आपण सर्वच पातळ्यावर दुटप्पी वर्तन करतो.मराठीचे गोडवे गातो नि मुलें इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो. दुकानावरची पाटी मराठीत हवी, परंतु दुकानातील माल परदेशी नि त्यावरील लेबल
इंग्रजी भाषेत,अशा हास्यास्पद स्थितीमुळे भाषिक संदर्भात
आपले वर्तन दुटप्पी वाटते.
असे मार्मिक विचार नगर येथील प्रसिद्ध समीक्षक प्रा. डाॅ. सुधाकर शेलार यांनी  व्याख्यानात व्यक्त केले. मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड व जामखेड महाविद्यालय जामखेड यांचे संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ  सुनील नरके यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच डॉ शेलार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते.प्रा.मधुकर राळेभात यांनी प्रास्ताविक करुन पाहुण्यांचा परिचय करून दिला.मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक तुकाराम घोगरदरे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार डॉ. कदम सर यांनी मानले. सदर  कार्यक्रमास प्रसिद्ध लेखक आ.य.पवार, डॉ जतीन काजळे, डॉ. विद्या काशीद, डॉ.गोलेकर ,प्रा.केळकर, प्रा.मिसाळ, प्रा.शिवाजी राळेभात आदीसह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी  व प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here