जामखेड तालुक्यातील सेवा संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू २१ संस्थेच्या पाच टप्प्यात निवडणूका

0
274

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – – – 
जामखेड तालुक्यातील सोसायटी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा व महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अकरा सेवा संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहा संस्थेच्या अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत तर आज बुधवार दि. २ रोजी चार सेवा संस्थेच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
            पहिल्या टप्प्यात तीन सेवा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          तालुक्यातील झिक्री सेवा संस्थेची निवडणूक १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. ८ तारखेपर्यंत माघार घेण्याची तारीख आहे.
    रत्नापूर सेवा संस्था ८ फेब्रुवारी माघार घेणे तर २० फेब्रुवारी रोजी मतदान आहे.
     कवडगाव सेवा संस्था माघार घेणे अकरा फेब्रुवारी तर २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे.
        दुसऱ्या टप्प्यात चार सेवा संस्था आहेत.
कुसडगाव सेवा संस्था माघार दि. ४ ते १८ फेब्रुवारी पर्यंत तर सहा मार्च रोजी मतदान होईल.
  हळगाव सेवा संस्था  माघार दि. ४ ते १८ फेब्रुवारी पर्यंत तर पाच मार्च रोजी मतदान होईल.
   वंजारवाडी सेवा संस्था उमेदवारी माघार घेणे ३ ते १७ फेब्रुवारी पर्यंत तर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल
    नान्नज सेवा संस्था उमेदवारी माघार घेणे ३ ते १७ फेब्रुवारी पर्यंत तर २६ फेब्रुवारी रोजी मतदान होईल.
 
     तिसऱ्या टप्प्यात चार सेवा संस्थांच्या निवडणुका आहेत. 
 
   कोल्हेवाडी सेवा संस्था नामनिर्देशन भरणे ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी तर माघार ११ ते २५ फेब्रुवारी पर्यत आहे १३ मार्च रोजी मतदान होईल. 
 
जवळके सेवा संस्था नामनिर्देशन भरणे ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी तर माघार ११ ते २५ फेब्रुवारी पर्यत आहे १२ मार्च रोजी मतदान होईल.
    अरणगाव सेवा संस्था नामनिर्देशन भरणे ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी तर माघार ११ ते २५ फेब्रुवारी पर्यत आहे १२ मार्च रोजी मतदान होईल.
     जामखेड सेवा संस्था नामनिर्देशन भरणे ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी तर माघार ११ ते २५ फेब्रुवारी पर्यत आहे. १३ मार्च रोजी मतदान होईल.
         चौथ्या टप्प्यात सहा सेवा संस्था आहेत
    यामध्ये शिऊर, लोणी, जातेगाव, सातेफळ, राजुरी, उंडा या संस्थेच्या प्रारूप व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे लवकरच नामनिर्देशन भरणे व निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
      पाचव्या टप्प्यात चार सेवा संस्था आहेत
     सुभाषवाकी, साकत, जवळा, बावी यांची आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे तर २८ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नंतर थोड्याच दिवसात नामनिर्देशन पत्र दाखल करणे व निवडणूक तारीख जाहीर होईल.
        वरीलप्रमाणे २१ सेवा संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लागलेला आहे यासाठी भाजपा व महाविकास आघाडीने जास्तीत जास्त सेवा संस्था आपल्या ताब्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here