जामखेडमध्ये खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल वीस हजाराचे व्याज झाले सात लाख

0
459
जामखेड प्रतिनिधी
                जामखेड न्युज – – – – – 
       व्याजाने घेतलेली २०,०००  रुपये मुद्दल एकरकमी देवुन  तुझ्याकडे व्याजासह ७ लाख रूपये फिरत आहेत . असे म्हणुन पैसे परत कर असा तगादा लावला तसेच डिसेंबर २०२० ते आजपर्यंत पैश्यांची मागणी करत दि. २७/१/२०२२ रोजी फिर्यादी महिला चित्रा विश्वनाथ समुद्रे घरामध्ये काम करित असताना खाजगी सावकार व या गुन्हयातील आरोपी मंगल मोरे ही घरामध्ये येवुन पैसे दिले नाही म्हणुन शिवीगाळ दमदाट केली.  मी तुमचे पैसे परत केले आहेत मग मला शीवीगाळ का करता असे विचारल्याचा तिला राग आल्याने मंगल मोरे हीने मला लाथाबुक्याने मारहान केली व आठ दिवसामध्ये माझे पैसे परत नाही केले तर जीवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.
           या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या घटनेतील फिर्यादी नामे चित्रा विश्वनाथ समुद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझे घरामध्ये मी सोडुन दुसरे कोणीही कमवते नसल्या मुळे मला माझे घरगुती अडचणी कामी पैश्याची अवश्यकता होती त्यामुळे मी खाजगी सावकार असलेल्या  मंगल मोरे या महिलेकडून वीस हजार रूपये घेतले होते. त्यानुसार मी २३ फेब्रुवारी २०२० रोजी घेतलेली २०,००० रुपये मुद्दल एकरकमी देवुन टाकली. अशा पध्तीने मी मंगल मोरे यांचे कडुन घेतलेले २०००० रुपये व्याजासहीत २७ नोव्हेंबर २०२० रोजी परत केले मात्र खाजगी सावकार असलेल्या  मंगल मोरे या महिलेने मला वरील रक्कमेपोटी सदर पैशाचे तुझ्याकडे व्याजासह ७ लाख रूपये फिरत (येणे) आहेत. असे म्हणुन सदर पैसे परत कर असे म्हणत वेळीअवेळी तगादा लावला. तसेच  डिसेंबर २०२० ते आजपर्यंत मला पैश्यांची मागणी करत आली. दि. २७/१/२०२२ रोजी सकाळी ९:००  वाजेचे सुमारास. मी माझे घरामध्ये काम करीत असताना खाजगी सावकार मंगल मोरे ही माझे घरामध्ये येवुन मला पैसे दिले नाही म्हणुन शिवीगाळ दमदाट करु लागली. त्यावेळी मी तीला म्हणले की, मी तुमचे पैसे परत केले आहेत. मला शीवीगाळ का करता असे विचारल्याचा तिला राग आल्याने मंगल मोरे हीने मला लाथाबुक्याने मारहान केली व आठ दिवसामध्ये माझे पैसे परत नाही केले तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी देवुन घरामधुन निघून गेली.
 अशाप्रकारे दि. २७/१/२०२२ सकाळी ९ :०० वाजताचे सुमारास मी माझे घरामध्ये काम करित असताना मी मंगल मोरे यांचे कडुन घेतलेल्या २०००० रुपयांचे बदल्यात व्याजासहीत ७ लाख रूपये का दिले नाही म्हणुन घरामध्ये घुसुन लाथाबुक्याने मारहान करून शिवीगाळ दमदाटी करुन जिवे ठार मारन्याची धमकी दिली व सावकारकीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे दिले म्हणून  फिर्यादी चित्रा विश्वनाथ समुद्रे वय ३५ धंदा – मजुरी रा. नागेश शाळेजवळ  जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  मंगल मोरे या खाजगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here