जामखेड न्युज – – – –
सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवलेला आहे. देशात तिसरी लाट धडकली आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या अव्वल आहे. दरम्यान सध्या मास्क हे कोरोनाविरोधात प्रभावी शस्त्र आहे.
परंतु राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे वृत्त आले आहे. काल महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. कोरोनाला प्रतिबंध करणारी लस निर्माण झाल्यानंतर जगभरात सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
अनेक देशांमध्ये अत्यंत वेगाने लसीकरण पूर्ण झालं असल्यानं तिथली जनता मास्क आणि अन्य कठोर निर्बंधातून मुक्त झाली आहे. राज्यात देखील मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे.
आज कॅबिनेट बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे. महाराष्ट्रातील कोविड १९ संसर्गाची परीस्थिती आणि संभाव्य असलेल्या चौथी आणि पाचव्या लाटेची शक्यता आहे.
या सर्वांचा सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता.
इस्रायल अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्यानं तिथं पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले.
आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन , अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. आपल्या देशातही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून अतिशय वेगानं लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
राज्यात आतापर्यंत 14 कोटी 69 लाख 57 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी 3 लाख 12 हजार 240 नागरिकांनी दुसरा तर 8 कोटी 59 लाख 17 हजार 37 पहिला डोस देण्यात आला आहे.









