Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या खळबळजनक! TETमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केले...

खळबळजनक! TETमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पास

0
272
जामखेड न्युज – – – 
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. आता अशीच एक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं आहे. पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे.
2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली.  2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले.
13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले होते.  राज्यातील शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.  जे शिक्षक प्रमाणपत्र सादर करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला होता.
शिक्षकांकडून मागवण्यात आलेली कागदपत्रे-
शिक्षकांकडून त्यांचे संपूर्ण नाव,  MAHATET(महा टीईटी ) चा बैठक क्रमांक, पेपर क्रमांक, उत्तीर्ण वर्ष आणि शेरा ही संपूर्ण माहिती मागवण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी TET परीक्षा घोटाळ्यात आणखी एक माहिती समोर आली होती. तुकाराम सुपेंचा ड्रायव्हरचं विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट आरोपींना पुरवत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली होती.  महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याने पाठवलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट त्याच्या कार्यालयीन गाडीवर चालक असलेला सुनील घोलप इतर आरोपींना पाठवत असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले होते. घोलप यांच्यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली होती. घोलप याने 2020 मधील टीईटीमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अॅपवर पाठवत असे. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवत असल्याचे तपासात समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!