जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील साकत येथिल श्री साकेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या मंदिराचे बांधकाम हे पुरातन असे दगडी हेमाडपंती आहे. मंदिराला काही ठिकाणी चिरा तर खाचखळगे पडलेले होते तेव्हा गावातील तरूणांनी एकत्र येऊन मंदिराचा पुर्ण गाभारा ग्रेनाइटने सुसज्ज केला पीओपी केली व खालीही चांगल्या प्रकारे फरशी टाकली संपूर्ण भिंतीतील चिरा बुजवल्या तसेच मंदिरासाठी सभामंडपाच्या स्लॅबवर उंच श्री साकेश्वर मंदिर अशी लाइटिंग केली यामुळे मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.
संपुर्ण तालुकाच नाही तर पंचक्रोशीत साकत गावाला खुप मोठा अध्यात्मिक वारसा आहे. गुरूवर्य वै. रामचंद्र बोधले महाराज यांनी गावातील विठ्ठल मंदिरात विनावापर व नंदादीप सुरू केले होते आजही अखंडपणे विनावापर व नंदादीप सुरू आहे याबद्दल परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करतात.श्री साकेश्वर महाराज देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. संपुर्ण ग्रामस्थांची साकेश्वरावर मोठी श्रद्धा आहे. तालुक्यात सर्वाधिक नोकरदांराचे गाव म्हणून साकतची ओळख आहे.
ADVERTISEMENT 

महाशिवरात्र व चैत्र महिन्यातील पौर्णिमा नंतर येणाऱ्या सोमवारी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होते यात्रेसाठी बाहेरगावी नोकरी कामधंदा निमित्त असणारे सर्व ग्रामस्थ येतात रात्री देवाच्या पालखीची संपुर्ण गावात मिरवणूक निघते दुसर्या दिवशी हगामा भरतो राज्यभरातील मल्ल हजेरी लावतात.
ग्रामदैवत साकेश्वर महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प काही तरूणांनी मांडला व माजी कृषी अधिकारी सुरेश (भाऊ) वराट, साकेश्वर मोटर्सचे मालक राजाभाऊ वराट, गजेंद्र वराट (काका), अशोक कारभारी वराट, कैलास बापुराव सानप, बळीराम लहाने ( अप्पा टेलर), प्रभाकर त्रिंबक वराट, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल परमेश्वर वराट, ग्रामपंचायत सदस्य राजू परमेश्वर वराट, रामहरी बजरंग वराट, राजस्थान मार्बल अॅड ग्रेनाइटचे मालक शहादेव वराट, बापू राक्षे, प्रतिक मुरुमकर, राम दिलीप वराट, दिलीप जगन्नाथ वराट, कैलास अर्जुन वराट, शहाजी घोलप, रावसाहेब मुरुमकर, संदिप मुरुमकर, निवृत्ती गवळी, शिलादिप प्लायऊडचे मालक सचिन वराट यांच्या सह अनेक तरूणांनी मदत करत मंदिराचा जीर्णोद्धार केला.
तसेच गावातील गणेश वराट आणि भरत वराट फौजी यांनी सभामंडपाच्या स्लॅबवर लोखंडी अॅगल वापरून उंच असे श्री साकेश्वर मंदिर असे नाव तयार केले रात्री लाईट मध्ये खुपच आकर्षण असे हे नाव दिसते उंच असल्याने दुरूनही ते दिसते त्यांनी साकेश्वर मंदिर नाव अर्पण केले व मंदिराची शोभा वाढविली.