जामखेड न्युज – – –
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनकरण करा, या मागणीसाठी अजूनही आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनात पुढारपण करणारे तब्बल पाच हजार 555 कर्मचारी बडतर्फ केले आहेत. सात हजार 235 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची तर 11 हजार 24 कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. वारंवार आवाहन करूनही कामावर न आलेल्या त्या 23 हजार 814 कर्मचाऱ्यांचा परतीचा मार्ग बंद झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.(Maharashtra State Transport Corporation Big action)
ADVERTISEMENT 

दिवाळीच्या सणात महामंडळाला सर्वाधिक उत्पन्नाची अपेक्षा असते. तरीही, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचवेळी विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले. सुरवातीला भाजप आमदार गोपिचंद पडळकर व रयतक्रांतीचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनात उडी घेतली. मात्र, परिवहनमंत्री ऍड. परब यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतर त्यांनी आंदोलनातून माघार घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बैठक घेऊन आंदोलनाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.
बैठकीनंतर परिवहनमंत्र्यांनी कामावर येणाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचा शब्द दिला. तरीही, जवळपास 34 हजार कर्मचारी अजनूही आंदोलनावर ठाम राहिले. तीन महिन्यांपासून लालपरीची वाहतूक विस्कळीत झाली असून आंदोलनामुळे महामंडळाला जवळपास बाराशे कोटींचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या काही बसगाड्या मार्गावर धावत असतानाही महामंडळाला अपेक्षित मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता आंदोलकांवरील कारवाई कठोर केली जात आहे. निलंबनाची व बडतर्फीची नोटीस दिलेल्यांसह बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर करून घेऊ नका, असे विभाग नियंत्रकांना वरिष्ठांचे आदेश आहेत. ज्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यांनाही काही दिवसांची मुदत देऊन कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कारवाईची राज्यातील स्थिती…महामंडळाचे एकूण कर्मचारी – 92,266कामावर हजर कर्मचारी – 34,282बडतर्फ कर्मचारी – 5,555बडतर्फीची नोटीस – 7,235निलंबीत कर्मचारी – 11,024”वेतनवाढीनंतर महामंडळ वाचविण्यासाठी कामावर या, विलीनीकरणाचा लढा कामावर हजर राहूनही लढता येऊ शकतो, असे सातत्याने आवाहन करूनही बहुतेक कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांसह बडतर्फ आणि निलंबनाची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता कामावर हजर करून घेतले जात नाही. कोणतीही कारवाई न झालेल्यांना हजर करून घेतले जात आहे.”- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर