जामखेड न्युज – – – –
सैन्य दलात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना एक चांगली संधी आहे. इंडियन आर्मी ब्रांच इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासंदर्भातील जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल (टीएस), कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल या पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार
लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, कर्नल, कर्नल (टीएस), कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरील पदासाठी उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान 55% एकूण गुण असणं आवश्यक आहे. याशिवाय बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद असणं आवश्यक आहे. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पदवीनंतर दोन वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
लेफ्टनंट – 56,100 – 1,77,500 रुपये प्रतिमहिना
कॅप्टन – 61,300 – 1,93,900 रुपये प्रतिमहिना
मेजर – 69,400 – 2,07,200 रुपये प्रतिमहिना
लेफ्टनंट कर्नल – 1,21,200 – 2,12,400 रुपये प्रतिमहिना
कर्नल – 1,30,600 – 2,15,900 रुपये प्रतिमहिना
ब्रिगेडियर – 1,39,600 – 2,17,600 रुपये प्रतिमहिना
मेजर जनरल – 1,44,200 – 2,18,200 रुपये प्रतिमहिना
कोणकोणती कागदपत्रं आवश्यक
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2022
PDF जाहिरात पहा – https://cutt.ly/TIMAk4M
ऑनलाईन अर्ज – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx