जामखेड न्युज – – – –
शिक्षक असलेल्या पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात शिक्षक पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीने फिर्याद दिली आहे. २०१८ मध्ये जामखेड पोलिस स्टेशनला याच शिक्षकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी तो शिक्षक निलंबित होता
फिर्यादी सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात
राहतात. त्या एका खासगी रूग्णालयात नोकरी करत आहे.
जामखेड तालुक्यातील एका जिल्हा परिषद वस्ती
शाळेतील शिक्षकासोबत त्यांची ओळख होती. ओळखीतून
त्यांनी 18 जुलै 2018 रोजी लग्न केले होते. लग्नानंतर तो
शिक्षक पती फिर्यादी यांना त्रास देत असल्याने जामखेड पोलीस स्टेशनला २०१८ मध्ये याच मुलीने याच रविकिरण भास्कर भोजने या शिक्षकांविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता २०१२ ते २०१८ पर्यंत सहा वर्षे या शिक्षकाने अत्याचार केला असे तक्रारीत म्हटले होते. खोटे बोलून भीती दाखवून लग्न केले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर
तो शिक्षक निलंबित झालेला होता. त्या जामखेड सोडून अहमदनगर शहरात राहण्यासाठी आल्या होत्या.
त्या शिक्षकाने त्यांचा पत्ता शोधून त्या राहत असलेल्या
अहमदनगर शहरातील त्यांच्या रूमवर ये-जा वाढविली.
18 जानेवारी 2022 रोजी शिक्षक पतीने तिच्या रूमवर
येत तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. झालेल्या
घटनेमुळे घाबरलेल्या पीडिताने पोलीस अधीक्षक मनोज
पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार
अर्जावरून तोफखाना पोलिसांनी पीडितेचा पतीविरूध्द
अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास
तोफखाना पोलीस करीत आहे.
चौकट
शिक्षक रविकिरण भोजने हा २०१२ ते १०१८ पर्यंत जामखेड तालुक्यातील एका वस्ती शाळेवर शिक्षक होता किर्तन, प्रवचन करत होता अध्यात्मिक क्षेत्रात लोकांना ज्ञानामृत पाजण्याचे काम करणारा हा शिक्षक जर चुकीचे काम करत असेल तर त्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



