जामखेड न्युज – – –
राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल काळ जाहीर झाले. यात कर्जत नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी चांगलाच करिष्मा दाखवलाय. राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केलाय. दुसरीकडे, सांगलीमध्ये रोहित पाटील यांना एकहाती सत्ता राखण्यात कमालीचं यश आलंय. त्यामुळे रोहित सारख्या युवकांना पक्षाने संधी दिली पाहिजे, अशी मागणीच आता आमदार रोहित पवार यांनी केलीय.
एकीकडे अहमदनगर – कर्जत नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांनी एक हाती सत्ता आणली. तर दुसरीकडे, सांगलीमध्ये दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या मुलगा रोहित पाटील याने एकहाती 10 जागा जिंकून आणल्या आहे. ज्यामुळे रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलंय.
आत्तापर्यंत रोहित पाटील सारख्या युवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय. त्यामुळे अशा युवा लोकांना पक्षाने संधी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे’, असं म्हणत रोहित यांनी शारदास पवारांकडे एक नवी मागणीच केली आहे.
कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटलांनी चांगली मेहनत घेतली आणि त्याला यश मिळालं त्यांचं कौतुक आणि अभिनंदन आहे, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील रोहित पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलंय. भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचं शह देऊ शकते हे वारंवार दिसून आलंय. चंद्रकांतदादा ज्या ज्या ठिकाणी जातात तिथले अनुभव पाहता त्यांना किती यश मिळतं हे त्यांनी पाहावं. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात म्हणून नाही तर तिथे एकत्र निवडणूक लढवली आणि तिथे चांगलं यश मिळालं. तिथे कार्यकर्त्ययानी खूप मेहनत घेतली, असंही बोलताना पाटील म्हणाले.