Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने केली पस्तीस लाखांची विदेशी दारू...

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने केली पस्तीस लाखांची विदेशी दारू जप्त

0
453
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
    विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या टॅम्पोवर कारवाई करत कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सुमारे ३४ लाख ६७ हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून अशी कारवाई पहिल्यांदाच झाली असल्याने अवैध धंद्यांविरोधात कर्जत उपविभागातील पोलीस अधिकारी अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
       पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कर्जतचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, कर्जत-श्रीगोंदे  रस्त्यावरून एका आयशर टेम्पोतून विदेशी दारूची घेऊन जाणार आहे. या माहितीनुसार  पोलीस पथक तयार करून रवाना केले. सदर पथक कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर गस्त करीत असताना राक्षसवाडी गावच्या शिवारात एक केसरी रंगाचा आयशर टेम्पो क्र. MH12-QW 9608 संशयास्पद वाटल्याने  त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चालकाने त्याचे नाव गीताराम आनंदा लंके रा. निघोज ता. पारनेर असे सांगितले. हा टेम्पो स्वतःच्या मालकीचा असून त्यावरील नंबर चुकीचा आहे असे त्याने सांगितले. यावेळी पोलीस पथकाने सदर टेम्पोची झडती घेतली असता आतमध्ये मागील बाजूस कोंबड्यांचे खाद्याच्या गोण्या व मागील बाजूस विदेशी दारूचे खोके आढळून आले.
    पोलीस पथकाने हा माल कोणाचा आहे विचारले असता त्याने हे दारूचे बॉक्स प्रकाश शेळके (पूर्ण नाव माहीत नाही ) रा. निघोज ता. पारनेर यांच्या घरी घेऊन चाललो असल्याचे सांगितले आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्यानेय टेम्पोसह मुद्देमाल कर्जत पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. यात एकूण ३७० विदेशी दारूचे बाॅक्स जप्त व आयशर टेम्पो असा ३४ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आणि गीताराम लंके यास ताब्यात घेतले आहे. तसेच आयशर टेम्पोच्या मूळ नंबरची माहिती घेतली असता त्याचा नंबर MH. 16 CD 3699 असा असल्याचे समजते  असल्याचे समजते आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात पोकॉ. सागर जंगम यांच्या फिर्यादीवरून भादवि . कलम ४२०,३४ मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ ( ई ) ( अ ), ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हृदय घोडके, सागर जंगम, संतोष साबळे, इरफान शेख आदींच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!