जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
एक अज्ञात तरूण कुरिअर (couriyar) बॉय म्हणून सध्या जामखेड शहरात कुरियरच्या नावाने लोकांची फसवणूक करत आहे. तरी कोठे आढळल्यास किंवा दिसल्यास जामखेड पोलीस स्टेशन ला कळविण्याचे आवाहन जामखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्याबाबतचा टेक्स्ट मेसेज विविध WhatsApp वाॅटस्अॅप ग्रुपवरून जामखेड पोलीसांनी फोटो व मेसेज टाकला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मित्रांना माहिती व्हावी म्हणून परत दुसर्या गृपवर मेसेज टाकलेला आहे.
तरी नागरिकांनी त्याच्या पासून सावध राहावे. व तो आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन जामखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.








