Saturday, March 7, 2026
Home ताज्या बातम्या प्रतिक्षा संपली!!! जामखेडमधील 58 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

प्रतिक्षा संपली!!! जामखेडमधील 58 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

0
489
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील सर्व च्या सर्व ५८ ग्रामपंचायतींसाठी आज सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. साखळी पध्दतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आरक्षणाच्या कार्यक्रमावेळी विविध गावांचे गावकारभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडती दरम्यान तहसिलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसिलदार नवनाथ लांडगे व गटविकास अधिकारी परशुराम कोकणी सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रशासनाने जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचे जाहिर केलेले आरक्षण खालील प्रमाणे-
तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षित ग्रामपंचायत रत्नापुर, धनेगाव, हळगाव तर अनुसूचित व्यक्ती जवळा व कवडगाव तर अनुसूचित जमातीसाठी गुरेवाडी ग्रामपंचायत मध्ये व्यक्तीसाठी आरक्षण पडले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिला आरक्षण – आघी, खुरदैठण , चोंडी, तरडगाव, नायगाव, बाळगव्हाण, मोहरी, मुंजेवाडी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षण – आपटी, जवळके, धानोरा, मोहा, पाटोदा, पिंपळगाव उंडा, बांधखडक, राजेवाडी.
सर्वसाधारण खुला प्रवर्ग महीलांसाठी आरक्षण – आंनदवाडी, खर्डा, खांडवी, जातेगाव, जायभायवाडी, डोणगाव, तेलंगशी, दिघोळ, धामनगाव, धोंडपारगाव, नाहुली, पिंपळगाव, आळवा, फक्राबाद, बोर्ले, राजुरी, शिऊर, साकत व सातेफळ
सर्वसाधारण खुला प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षण – अरणगाव, कुसडगाव, घोडेगाव, चोभेवाडी, झिक्री, देवदैठण, नान्नज, पाडळी, पिंपरखेड, पोतेवाडी, बावी, मतेवाडी, लोणी, वाघा, सावरगाव, सोनेगाव, वाकी व सारोळा अशा ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!