जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सध्या तरूण पिढी मोबाईलच्या जास्तीत जास्त आहारी गेली आहे. यातून चिडचिडेपणा निर्माण झाला आहे. तेव्हा तरूणांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळून याहिया पठाणचा आदर्श घेत मैदानी स्पर्धेत नावलौकिक मिळवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले.
ADVERTISEMENT 

याहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, खजिनदार सुदाम वराट, समीर शेख, धनराज पवार, रोहित राजगुरू, जाकीर शेख, दानिश पठाण, राकेचा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय कोठारी म्हणाले की, शारीरिक तंदुरुस्तीसाठी तरूणांनी मैदानी स्पर्धेत सहभाग नोंदवावा याहिया पठाणचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले तसेच याहिया पठाणला भारताचा कर्णधार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.









