जिद्द, चिकाटी व मेहनतीने गरिबीला हरवलं, गडचिरोलीचा लेक आता IIT मुंबईत शास्त्रज्ञ!

0
243
जामखेड न्युज – – – – 
गडचिरोली जिल्ह्यातील मारकबोळी येथील कुलदीप कुनघाडकरची देशातील नामांकीत आय.आय.टी मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.
गडचिरोली: जिल्ह्यातील मारकबोळी येथील कुलदीप कुनघाडकरची देशातील नामांकीत आय.आय.टी मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करत जिद्द चिकाटी व मेहनतीने
कुलदीपने यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरावरून त्याचं कौतुक केलं जात आहे.
                      ADVERTISEMENT
कुलदीपचे १२ पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे झाले. धरमपेठ एम.पी देव कॉलेजमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर नामांकित इस्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्याने भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
शेतकरी कुटूंबातून येणाऱ्या कुलदीपने प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्याने प्रसंगी मनरेगाच्या योजनेतदेखील काम केलं. गावातील लहान विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो.
आय.आय.टी मुंबईत निवड होण्यापूर्वी ‘एज्युकेट गडचिरोली’ या फेलोशिपसाठी सुद्धा त्याची निवड झाली होती आणि त्याने काही महिने कूरखेडा तालुक्यातील आश्रम शाळेत फेलो म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. आय.आय.टी, मुंबईच्या प्रायोगिक सुष्मतरंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि अनुसंधान संस्था या प्रकल्पासोबत तो संशोधक वैज्ञानिक म्हणून काम करणार आहे.
कुलदीप बालपणापासूनच फार मेहनती आणि होतकरू होता. मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीपची वैज्ञानिक म्हणून निवड होणे ही फार भूषणावह बाब आहे. नवोदय विद्यालय परिवाराकडून सुद्धा त्याचे अभिनंदन केलं गेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here