किचनच्या मैदानात पंकजा मुंडे अन् रोहित पवार आमनेसामने

0
229
जामखेड न्युज – – – – 
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर मस्त मजेदार ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे पडद्यावर उत्तम अभिनय करणारे हे कलाकार ज्यावेळी स्वयंपाक घरात शिरतात त्यावेळी त्यांची कशी तारांबळ उडते हे  या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये यावेळी एक नवा बदल पाहायला मिळणार आहे. कलाकारांच्या गर्दीत सजणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आता थेट राजकीय नेते येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये या कार्यक्रमात पंकजा मुंडे ( Pankaja Munde), रोहित पवार (rohit pawar)आणि प्रणिती शिंदे (praniti shinde)  ही नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत.विशेष म्हणजे या वेळी या दिग्गजांमध्ये खुर्चीचाही एक डाव रंगणार आहे. विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी या स्पर्धकांना कधी युतीचा तर खुर्चीचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे  गटारी अमावस्येला त्यांची कशी फजिती झाली, प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? असं बरंच काही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे किचन कल्लाकारचा हा नवा भाग प्रेक्षकांसाठी मेजवानीसोबतच अनेक गोष्टींसाठी धमाकेदार ठरणार आहे. इतकंच नाही तर दिग्गजांसोबत प्रसिद्ध युट्यूबर मधुरा बाचलदेखील राज शेफ म्हणून या कार्यक्रमात एन्ट्री करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here