जामखेड न्युज – – – –
देशातील सर्वात मोठ्या दुर्गराज गड किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यात 25 डिसेंबर शनिवार रोजी पार पडला.या स्पर्धेत 1493 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कर्जत-जामखेड विभागातून सारंग शरद शिरसाट याने कर्जत-जामखेड या विभागातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यामुळे सारंग शिरसाट याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
पहिला गट मुख्य स्पर्धा
दुसरा गट मुक्तछंद
व तिसरा गट कर्जत-जामखेड
या तीन गटांपैकी कर्जत-जामखेड विभागातून सारंग शरद शिरसाट याने कर्जत-जामखेड या विभागातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
11000 रू,सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक पुण्यामध्ये सारंग ला प्रदान करण्यात आले. कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात सृजन च्या व्यासपीठावर जल्लोषात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक स्वीकारण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता. शिवछत्रपतींच्या दैदीप्यमान इतिहासाची माहिती मिळवण्या सोबतच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल अशी अपेक्षा यावेळी आमदार रोहित दादा पवार यांनी व्यक्त केली. तसेच बक्षीस पात्र सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.
बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त आणि भीमथडी जत्रेच्या संयोजक सौ. सुनंदाताई पवार, मा. आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सारंग शरद शिरसाट याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे जामखेड व सौताडा येथील सर्व दुर्गप्रेमिंनी अभिनंदन केले.





