श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारीणी समितीच्या अत्यंत महत्वाची योजना असलेल्या राष्ट्रीय ज्ञान प्रकाश योजनेच्या सहमंत्री म्हणून श्री. शरद शांतीलाल शिंगवी, जामखेड यांची निवड करण्यात आली.

0
286
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट) 
    शरद शिंगवी हे जामखेड जैन संघाच्या कार्यकारणी सदस्यपदी तसेच धार्मिक, सामाजिक अन्य संस्थेवर कार्यरत असून, धार्मिक असा शिंगवी परिवार असून स्वत: तीन वेळेस मासखमण, पंधरा, सतरा, आठाई व कित्येक वेळा तेला हे उपवास केलेले असून त्यांच्या धर्मपत्नी सौ.आरती शरद शिंगवी हे जामखेड मध्ये पाठशाला चालवित असून त्यांनी देखील तपस्या केलेली आहे.
        शिंगवी परिवार धार्मिक असून श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चे अध्यक्ष श्रीमान
आनंदमलजी छल्लानी, ज्ञान प्रकाश योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान प्रेमचंदजी कोटेचा(भुसावळ), राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक श्री. अशोक (बाबूशेठ) बोरा (अहमदनगर) यांनी नियुक्तीचे पत्र दिले. राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य श्री. ईश्वर अशोकलालजी बोरा, श्री. विजयकांतजी गुगळे, श्री. अनिलजी कटारिया, श्री. किशोरजी पितळे या कार्यकारणी सदस्यांनी श्री. शरद शिंगवी जामखेड यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. नियुक्तीचे पत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याप्रसंगी जैन कॉन्फरन्सचे जेष्ठ मार्गदर्शक बाबुशेठ बोरा, सारडा कॉलेजचे संचालक अजितशेठ बोरा, बोरा ज्वेलर्स चे मालक श्री. ललित बोरा, जामखेड वर्धमान जैन श्रावक संघाचे ट्रस्टी श्री. अशोक शिंगवी, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here