Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या मोठी बातमी! राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार; अशी असेल नवी नियमावली!

मोठी बातमी! राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार; अशी असेल नवी नियमावली!

0
303
जामखेड न्युज – – – 
कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अशातच ख्रिसमस तसंच नवीन वर्षानिमित्त नवीन निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येची होणारी वाढ लक्षात घेता. हा संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील. याबाबत गुरूवारी टास्क फोर्स सदस्यांची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात पार पडलेल्या या बैठकीत नव्या निर्बंधावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
ख्रिसमस, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अशावेळी कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीनं बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज शुक्रवार म्हणजेच 24 डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
असे असू शकतात नवे निर्बंध
कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार आरोग्य सुरक्षात्मक खबरदारीचे पाऊल उचलणार.
सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात नवे निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर कलम 144 अन्वये रात्रीच्या वेळी जमाव बंदी किंवा संचारबंदी लागू करणार असल्याची शक्यता आहे.
लग्न समारंभ, ख्रिसमस, न्यू ईयर सेलिब्रेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोहळ्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याच्या गृहविभागाने चर्चमध्ये क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी असेल, असे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले आहे.
सोशल डिस्टेंसिंगच्या कोरोना नियमांचे पालन करावे, मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसंच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!