जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
सोलापूरवाडी ते आष्टी परिसरातील सर्व ग्रामस्थ यांना कळविण्यात येते की, सोलापूरवाडी ते आष्टी
लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून बुधवार दि.२९/१२/२०२१ व गुरूवार दि.३०/१२/२०२१रोजी या मार्गावर जलद गती चाचणी होणार आहे. तेव्हा कोणीही लोहमार्गाच्या जवळपास येऊ नये असे आवाहन मुख्य अभियंता मध्य रेल्वे निर्माण अहमदनगर यांनी केले आहे.
ही चाचणी सकाळी ८.०० ते सायं.८.00 या दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मध्ये होईल.तरी, सर्व आजू
बाजूचे ग्रामस्थांना असे कळविण्यात येते की, कोणीही लोहमार्गाच्या जवळपास येवू नये. तसेच कुठल्याप्रकारची वाहन, तसेच गुरे-ढोरे इ. लोहमार्गाजवळ येऊ देवू नये.
याबाबतची सूचनेची गावात दवंडी देण्यात यावी.
तसेच आपणास कळविण्यात येते की, तलाठी, मंडळाधिकरी, सरपंच व ग्रामस्थमौजे. पिंपळा, कुंटेफळ, कुंभेफळ, चिंचोली, धानोरा, साबळखेड, कडा, शेरी बु., जळगाव, मांडवा, कासारी, राधापूर व आष्टी यांना या संदर्भात सूचित करण्यात येत आहे.









