Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय, जनता राष्ट्रवादी बरोबर  – दत्तात्रय वारे 

ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय, जनता राष्ट्रवादी बरोबर  – दत्तात्रय वारे 

0
279
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – 
   जामखेड तालुक्यातील जवळा व नायगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. तालुक्यातील जवळा व नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी दि. २१ रोजी मतदान होऊन दि. २२ रोजी झालेल्या मतमोजणीत
आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारानी बाजी मारल्याने जामखेड तालुक्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी व्यक्त केली.
     या यशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होऊ शकतो . तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मधील कै. शबीरभाई शेख यांचे निधन झाल्याने येथे सर्वसाधारण जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. यामध्ये जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे व माजी सभापती दीपक पवार पाटील आणि जेष्ठ नेते मुरलीधर हजारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सरपंच प्रशांत शिंदे यांनी आ . रोहित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक सरपंच शिंदे यांच्या पुढील राजकारणाला दिशा देणारी ठरणार होती. सरपंच शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून पक्षाचे उमेदवार नव्युमभाई शेख यांना तब्बल ११० मतांनी विजयी करून आपले राजकिय प्रभुत्व सिद्ध करून दाखवले. यामुळे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या पोटनिवडणूकीमुळे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. या निकालाने जिल्हा परिषद, पंचायत राष्ट्रवादीचे  सरपंच प्रशांत शिंदे यांचा पुढील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा नगरिकांमध्ये सुरू झाली आहे.
पोटनिवडणूतील मतदान
जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकूण मतदान – ७७२ , किरण शिवराम हजारे ३२ ९ , नयूम अस्लम शेख ४३९ ( विजयी ) , नोटा -४ समिती आणि जवळा सेवा संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे .
नायगाव- पोटनिवडणुकीत एकूण मतदान ३४२ मतदार होते . यापैकी अण्णासाहेब भानुदास शिंदे यांना १३० मते , उगले सुवर्णा चंद्रकांत २२९ ( विजयी ), सिंधुबाई विठ्ठल शिंदे – ७३, सुखदेव जगन्नाथ शिंदे -४ नोटा-  ०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!