जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या सहकार्याकाने व लोकनेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोर्ट रोड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे २०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच नागरिकांची तपसणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आले.
जामखेड तालुक्यात दि १४ ते २१ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभाग,आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते,दरम्यान आज कोर्ट रोड परिसरात घेण्यात आलेल्या शिबिरात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला या परिसरातील सुमारे २५० नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला या शिबिरासाठी माजी नगरसेवक अमित जाधव,युवा नेते अमोल लोहकरे,राष्ट्रवादीचे कोअर कमिटीचे सदस्य प्रदीप शेटे, अभय शिंगवी, अॅड अमर कोरे, जाकीर पठाण, अंकुश बरबडे, विनय डुकरे, चेतन राळेभात यासह डॉ संदीप बेलेकर,आशा वर्कर वैशाली नन्नवरे मनीषा काटकर,यांनी सहकार्य केले यावेळी दि २२ ते २३ रोजी होणाऱ्या डोळे तपासणी व मोफत चष्मे शिबरासाठी प्रभागातील नागरिकांची नाव नोंदणी करण्यात आली