बंगळुर घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड कडुन कडाडून निषेध

0
290
जामखेड न्युज – – – 
छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपुर्ण हिंदुस्थानाचे आराध्या दैवत आहेत, आज जे सर्व जाती धर्माचे लोक हिंदुस्थानात स्वातंत्र्य ऊपभोगत आहेत ते फक्त छत्रपती शिवराय यांच्या बलिदानामुळे, त्यांच्या त्यागामुळेच. जगाव कस अन मराव कस हे ज्यांनी शिकवल व ज्यांच्या बलिदानामुळे आज देवळात देव आहे असे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचा आत्मा आहेत, आदर्श आहेत, स्वाभिमान आहेत व सर्वात महत्वाचे  म्हणजे आम्हा शिवभक्तांचा प्राण आहेत. अशा या महान राष्ट्ररत्न श्री शिवछत्रपतींच्या मुर्तीची बंगळूर येथे वांझोट्या मानसिकतेच्या श्वानाने ( डुक्कराने) विटंबना केली यापुर्वी ही वारंवार अशा महापुरूषांच्या मुर्ती ची विटंबना होत आलेली आहे, या पुढे अशा घटना वारंवार घडु नयेत या करता शासनाने राष्टद्रोहा सारखा कडक कायदा करावा व बंगळूर येथील विकृत मानसिकतेच्या औलादींवर कठोर कार्यवाई करावी असे निवेदन आज जामखेड तहसीलदार यांना देण्यात आले.
ज्या कर्नाटकातील बंगळूर मध्ये ही निंदनीय घटना घडली तेथे छत्रपती शिवाजी माहाराजांचे वडिल शाहजी राजे यांच्याकडे कर्नाटकातील जाहगीरी होती त्यामध्ये बंगळूर,कोलार, होसकट, दोड्डबल्लापुरा आणि सिरा ही गावे येत होती. शहाजी महाराजांनी बंगळूरला आपल्या जहागीरीची राजधानी बनवलं. शहाजी महाराजांनी बंगळूरचा खरा विकास घडवला. तिथे अनेक बागा उभारल्या. गावाची तटबंदी मजबूत केली. अनेक व्यापाऱ्यांना आणून वसवलं. मंदिरांचा जिर्णोध्दार केला. जागोजागी विहिरी बांधल्या. बंगळूरला एका राजधानीच स्वरूप आलं. अनेक मराठी कुटुंबे बंगळूरला स्थलांतरीत झाली. शहाजी महाराजांमुळे बंगळूर या छोट्या गावाचे रुपांतर गजबलेल्या व्यापारी शहरामध्ये झालं. बंगळूरूला पार दिल्लीपर्यंत शहाजी महाराजांची जहागीर म्हणून ओळखू लागले. तेथील कानडी रयतेच्या भल्यासाठी शाहीजी राजे भोसले यांनी आपल आयुष्य घालवले तेथेच ईतिहासाच अभ्यास नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती ची विटंबना होत आहे ही शोकांतिका आहे.
आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी  शिवछत्रपतीची उपासना, त्यांचे विचार, त्यांची युध्द निती आत्मसात केली शिवराय हे राष्ट्रहिताच प्रतीक आहेत आपल्या माहापुरूषांची विटंबना होत असताना समाजानी झोपलेल्या अवस्थेतुन उठल पाहिजे प्रतिकार केला पाहिजे, ज्या भारत भुमीत आपण राहतो ती भुमी शिल्लक राहिली आहे ती शिवछत्रपतीच्या कार्यामुळे हे विसरता कामा नये जर आपल्याला ईतिहासाच विसमरण होत असेल तर नक्कीच आपला देश पुन्हा पारतंत्र्यात गेल्या शिवाय राहणार नाही. आताच्या उगवत्या तरुण पिढीनं शिवछत्रपतीचं वाचन, अभ्यास करण गरजेच आहे खरा इतिहास समजुन घेणे काळाची गरज आहे नाहीतर या अशा घटना येत्या काळात वाढत राहतील. फक्त राजकारण आल की शिवरायांचा  जयघोष केला जातो पण आता मात्र पुढारी मुग गिळुन गप्प आहे हेच षडयंत्र ओळखळ्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले यांनी बोलतांना सांगितले झालेल्या घटनेचा जामखेड तालुक्यातील सर्व धारकरी व सर्व शिवप्रेमींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here