नगर पंचायत निवडणुकीत कर्जतकरांनी अनुभवला अनोखा प्रचार 

0
273
जामखेड न्युज – – – – 
कर्जत नगर पंचायत निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागल्याने राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात चांगलंच तापलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत असलेला अनोखा प्रचार कर्जतकरांनी यंदा अनुभवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे स्वतः या प्रचारात सहभागी झाले आणि एवढंच नाही तर कर्जतकरांनी या पूर्वी कधीही प्रचारात न पाहिलेल्या आणि न अनुभवलेल्या गोष्टी या वेळी पाहायला मिळाल्या. सप्तसुत्रीच्या माध्यमातून नागरिकांना पॉकेट कॅलेंडरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच चौकाचौकात कार्यकर्ते व उमेदवारांनी सभा घेतल्या आणि आमदार रोहित पवार यांच्या विकास कामांच्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आणि पुढील काळात नगर पंचायतीच्या माध्यमातून काय विकास होणार याबाबतही स्पष्टता देण्यात आली.
कर्जत शहरात 3200 च्या आसपास घरांची संख्या आहे. या प्रत्येक घरापर्यंत पॉकेट कॅलेंडर, जाहीरनामा तसेच स्वतः उमेदवारांनी भेटी दिल्या त्याच बरोबर तब्बल 11000 हून अधिक मतदार असलेल्या कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.   तसेच घराघरात प्रचार व निवडणुकीत उभे असलेले उमेदवार पोहोचले आहेत. यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि रंगतदार असल्याचं पाहायला मिळत आहे. आता अवघे शेवटचे काही तास प्रचारासाठी उरले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांसह उमेदवारांनीही चांगलीच कंबर कसली आहे.
यासोबतच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक प्रभाग निहाय प्रचाराच्या गाड्या आणि व्हिडीओ व्हॅनदेखील फिरत आहे. त्याचबरोबर येत्या 21 तारखेला नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या वेळी कर्जतमधील जनता नेमकं कुणाला कौल देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचबरोबर 22 तारखेला मतमोजणी पार पडेल त्यानंतर हे सर्व चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here