कर्जतमध्ये ऐन हिवाळ्यात वातावरण तापलंय !

0
286
जामखेड न्युज – – – 
 गेल्या काही दिवसांपासून कर्जतचं (Karjat) राजकारण तापलंय. नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. अशातच राम शिंदे (Ram Shinde) यांनी सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा आरोप केलाय. कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले आहेत, असं राम शिंदे यांनी म्हटलंय. कर्जत, पानरे, शिर्डी आणि नगर अकोले नगर पंचायतींसाठी राजकीय चुरस पाहायला मिळतेय.
    आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे की माझी दहशत आहे पण विकासाची दहशत आहे. राम शिंदे यांनी समोरासमोर बसून विकासाबाबत चर्चा करावी असे आवाहन केले आहे.
   कर्जतमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष रंगलाय. भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे राम शिंदे यांनी गंभीर आरोप केलेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावलं जात असल्याचा आरोप करतानाच शिब्बा सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आलाय. त्यांच्या प्रचारासाठी सकाळीच सभा घेण्यात आल्याचाही दावा राम शिंदे यांनी केलाय. हा सगळा सत्तेचा दहशतवाद असल्याची टीका राम शिंदे यांनी ट्विट करत केली आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही, असंही ते म्हणालेत. लोकशाहीची सारी मूल्य पायदळी तुडवली जात असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय.
     राम शिंदे यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी असे आवाहन आमदार रोहित पवारांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here