जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
गेल्या २९ वर्षापासुन शिक्षण क्षेत्रात असलेल्या संतोष हापटे गुरुजी (मामा) यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानतर्फे त्यांना यशवंतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संतोष हापटे हे शिक्षक म्हणून १९९२ साली रूजू झाले लेहनेवाडी, भुतवडा व मोहा या गावांमध्ये त्यांनी संपुर्ण सेवा केली आहे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांची यशवंतरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
जय मल्हार प्रतिष्टानच्या वतीने दरवर्षी राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देवून त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुरस्कार देवून सन्मान केला जातो. याही वर्षी राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मल्हार प्रतिष्टाणच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात अली असून श्री. संतोष हापटे गुरुजी.(मु.पो.हापटेवाडी पो. मोहा ता. जामखेड जि. अहमदनगर) यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना यशवंतरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्याची पावती जय मल्हार प्रतिष्टानकडून देण्यात आली. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





