जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यात चोरी व फसवणुकीचे २६ गुन्हे करणारा सराईत अट्टल गुन्हेगार जामखेड पोलीसांच्या मदतीने अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे याबद्दल जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे
मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन यांना मध्यप्रदेश राज्यातील नरवर पोलीस स्टेशन जि. शिवपुरी राज्य मध्यप्रदेश येथील पोलीस नामे पोउपनि मनिष सिंह जादौन यांनी संपर्क करून कळविले की, राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील वेगवेगळया ठिकाणी चोरी करणारा व फसवणुक करणारा आरोपी नामे फरमान अली उर्फ फिरोज उर्फ समिरुद्दीन उर्फ उडा नजीर अली हा अनेक गुन्हयात वरील राज्यातील पोलीसांना पाहिजे आहे परंतु तो मिळुन येत नाही व त्याने काही दिवसापुर्वीच नरवर पोलीस स्टेशन हद्दीत सोने चोरी करून तो महाराष्ट्रात प्रवेश केलेला असुन जामखेड येथे
आलेला असल्याची शक्यता आहे.
त्यांनी सदर चोराचे फोटो देखील मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन यांना पाठविले होते. मिळालेल्या माहितीवर मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळे पथक तयार करून व गोपनिय खबऱ्या मार्फत सदर आरोपीचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असता दि. १६/१२/२०२१ रोजी राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करणारा व फसवणूक करणारा आरोपी नामे फरमान अली उर्फ फिरोज उर्फ समिरुद्दीन उर्फ उडा नजीर अली हा जामखेड शहरातील एका ठिकाणी राहत असल्याचे समजल्याने त्यांनी त्यास मोठया शिताफीने ताब्यात घेतले त्यावेळेस त्याचे ताब्यात एक ईको स्पोर्ट गाडी मिळुन आली आहे व त्याच वेळी मध्यप्रदेश राज्यातील नरवर पोलीस स्टेशन जि. शिवपुरी राज्य मध्येप्रदेश येथील पोलीस नामे पोउपनि मनिष सिंग जादौन हे देखील त्यांचे टिमसह जामखेड येथे दाखल झाल्याने त्यास त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याची व गाडीची झडती घेतली असता सदर आरोपीच्या ताब्यात एक ईको स्पोर्ट गाडी, सोने चांदी सारख्या धातुचे दागिणे तसेच वेगळया राशीचे खडे त्यात डायमंड, मोती, मरियम, जमुनिया, काला हकीक, मिक्स हकिक, ओपल, मुन्गा, हद्दीद, निलम, गोमेंद तसेच वेगवेगळया प्रकारचे ०६ मोबाईल व त्यामध्ये असणाऱ्या सिम व्यतिरिक्त इतर वेगवेगळया कंपन्याचे ०६ सिम मिळुन आलेले आहेत. सदरचा सर्व मुद्देमाल हा मध्यप्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिलेला आहे.
सदर आरोपीने यापुर्वी देखील राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील वेगवेगळया ठिकाणी चोरी
तसेच फसवणुक केलेली असुन त्याकारणामुळे त्याचेवर वरील राज्यात २६ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले
असुन आणखी देखील गुन्हे त्याचेवर दाखल असण्याची शक्यता नरवर पोलीस स्टेशन जि. शिवपुरी राज्य मध्येप्रदेश
येथील पोलीस नामे पोउपनि मनिष सिंग जादौन यांनी वर्तवलेली असुन सदर सराईत अट्टल चोराबाबत बोलतांना
त्यांनी सागितले की, सदर आरोपी हा वेगवेळया नावाने वावरत असतो तसेच एका ठिकाणी तो जास्त वेळ थांबत नाही तसेच ज्या नवीन ठिकाणी तो राहतो तेथे तो नवीन मुलीशी लग्न करत असतो. चोरी किंवा फसवणुक करून
त्याठिकाणाहुन तो लगेच दुर निघुन जातो त्यामुळे तो पोलीसांना मिळुन येत नव्हता. परंतु महाराष्ट्र पोलीसांच्या
मदतीमुळे व मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन व त्यांच्या टिमच्या तत्परते मुळे
सदरचा आरोपी मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्र पोलीसांचे व मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस
स्टेशन व त्यांच्या टिमचे आभार मानले आहेत. तसेच मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस
स्टेशन यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की सदरचा आरोपी हा अटटल सराईत होता व त्याने जामखेड तसेच आजुबाजुच्या परीसरात देखील गुन्हा करण्याची शक्यता होती परंतु तो मिळुन आलेला आहे तसेच याआगोदर देखील बाहेर राज्यातुन तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळया पोलीस स्टेशन येथुन जामखेड पोलीस स्टेशन येथे मदत मागण्यासाठी आलेल्या पोलीसांना देखील आम्ही योग्य ती मदत केलेली आहे. तसेच सदरची कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, डिबी पथक प्रमुख पोउपनि राजु थोरात, पो.ना. अविनाश ढेरे, पो.कॉ. संग्राम जाधव, संदिप राउत, अरुण पवार, आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, संदिप आजबे यांचे टिमने केली आहे.
वरील कारवाई बद्दल जामखेड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.