Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या बापरे!!! दुधाला चक्क दहा हजार रुपये भाव

बापरे!!! दुधाला चक्क दहा हजार रुपये भाव

0
287
जामखेड न्युज – – – 
   सर्व प्राण्यांमध्ये हीन व ओझे वाहतुकीची कामे करणारा प्राणी म्हणजे गाढव याच गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव आला आहे. तुम्ही आज पर्यंत गायीच्या आणि म्हशीच्या दुधाबद्दल ऐकले, असेल त्याचे दर ३० रुपये ते जास्तीत जास्त ते १०० रुपयांपर्यंत ऐकले असतील. गाई आणि म्हशी या प्राण्याच्या दुधाला सर्वसाधारणपणे ४० ते ५० रुपयाचा भाव आहे.
रोजच्या वापरातील हे दुध असूनदेखील गाई आणि म्हशीच्या दुधाला इतका कमी भाव असल्याने अनेकदा आंदोलन झाल्याचे आपण पाहिले आहे. पण हिंगोली मध्ये वेगळाच प्रकार घडत आहे.
गाढविणीच्या दुधाला चक्क १० हजार रुपये भाव मिळत आहे. १० हजार रुपये भाव ऐकून चकित झालात ना ? हो हे खरे आहे. दहा हजार रूपये लीटर गाढवाचे दूध महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये गाढवाच्या दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
विशेष म्हणजे हे दूध 10 हजार रूपये लीटरने विकले जात आहे . तर एक चमचा दुधासाठी 100 रूपये मोजले जात आहेत. दहा मिली दूध घेण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत.
तसेच हे दुध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईतही हे दूध खूप प्रभावी आहे, असा दावा केला जात आहे. परंतु अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे, आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!