जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर आज ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाले यासाठी परिसरातील ६०९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती यातील ३३५ लाभार्थी १८ वर्षावरील होते तर २७४ लाभार्थी हे अठरा वर्षाखालील होते यामध्ये ३५० लाभार्थी पात्र ठरले त्यांना महिन्यात दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी दिली.
शिबीराचे उद्घाटन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख रमेश (दादा) आजबे माजी नगरसेवक मोहन पवार, सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली संजय कोठारी, ॲड. हर्षल डोके, संजय डोके, अशोक धेंडे, बापूसाहेब शिंदे, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण,
हरीभाऊ आजबे, नय्युम शेख, जूबेर शेख, नासिर सय्यद,
भीमा घोडेराव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, डॉ. शशांक शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, जयसिंग उगले, गणेश हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, डॉ. वाघ यांनी शिबिराबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक योगेश अब्दुले तर आभार डॉ. संजय वाघ यांनी मानले.
याशिबीरामध्ये ज्यांनी जुने प्रमाणपत्र ऑनलाईन केलेले आहेत. ज्या दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही तसेच ऑनलाईन झालेले नाही. अशा लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शिबीरात ६०९ दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती यातील ३३५ लाभार्थी १८ वर्षावरील होते तर २७४ लाभार्थी हे अठरा वर्षाखालील होते यामध्ये ३५० लाभार्थी पात्र ठरले यांना महिन्यात दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी दिली.