वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे साकत परिसरातील ज्वारी पीके भुईसपाट

0
306

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – – –
  साकत परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे ज्वारी पीके भुईसपाट झालेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणी आता रब्बी हंगामातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारी पीके भुईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
      चालू वर्षी परिसरात जून मध्ये चांगला पाऊस झाला त्यावेळी घाटमाथ्यावर सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणी पीक काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे काढणीच्या काळात चिखल आणी पाण्यातून सोयाबीन काढावे लागले यामुळे अनेक ठिकाणी बाधीत पीक झाले. जवळपास एक महिना पाऊस सतत सुरू होता.
     रब्बी हंगामाची पेरणीही थोडी उशिरा झाली. नंतर परत दोन वेळा मुसळधार पाऊस झाला यामुळे पीके जोमदार होती काही ठिकाणी डोक्यापर्यंत ज्वारी पीके वाढलेली होती. रात्री पासून जोरदार वारे व पाऊस सुरू झाला आणी डेरेदार दिसणारे पीक भुईसपाट झाले आहेत यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
     चालू वर्षी वर्षभर पाऊस आहे यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली होती. ज्वारी पिकांवर मोठ्या आळी होती गहू व हरभरा पीके तर ढगाळ वातावरणामुळे चांगले नाहीत ज्वारी पीक चांगले होते तेही भुईसपाट झाले आहे.
     महसूल विभागाने तातडीने नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here