मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाडळी शाळेस स्मार्ट टीव्ही सप्रेम भेट

0
302
जामखेड न्युज – – – – 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी तालुका जामखेड येथील इयत्ता दुसरी तील विद्यार्थी  कुमार सोहम भाऊसाहेब खैरे याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील श्री भाऊसाहेब आजिनाथ खैरे व चुलते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश आजिनाथ खैरे  यांच्या मार्फत शाळेस सुमारे 15 हजार किमतीचा स्मार्ट टीव्ही पाडळी शाळेस भेट दिला.यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
                       ADVERTISEMENT
       
यावेळी पाडळी गावचे सरपंच मा. श्री बाळासाहेब महादेव खैरे, नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबासाहेब कुमटकर, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण बलभीम खैरे, श्री शिवाजी कांतीलाल पवार, सोहम च्या मातोश्री सौ. भारती बाळासाहेब खैरे, त्याचे वडील श्री भाऊसाहेब आजिनाथ खैरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री गणेश आजिनाथ खैरे, श्री. गौतम शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे, ज्येष्ठ शिक्षक श्री बळीराम अवसरे, पदवीधर व यावर्षीचे आदर्श शिक्षक श्री पांडुरंग मोहळकर, पदवीधर शिक्षक श्री केशव हराळे, श्रीमती वैशाली कंगे, वर्गशिक्षिका श्रीमती छाया जाधव हे उपस्थित होते.
यावेळी नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबासाहेब कुमटकर यांनी बोलताना कोरोना काळात व सध्या या शाळेतील शिक्षक शाळेत देत असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळेत विविध उपक्रम राबवित असल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले व त्याचेच हे फलित असल्याचे सांगितले व सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री भाऊसाहेब खैरे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले व आभार मानले. मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे यांनी श्री भाऊसाहेब खैरे व गणेश खैरे यांच्या दानशूरतेबद्दल त्यांचे आभार मानले व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी स्मार्ट टीव्ही चा निश्चितच उपयोग होईल याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक पदवीधर शिक्षक श्री हराळे सर यांनी केले,
तर सूत्रसंचालन श्री पांडुरंग मोहळकर यांनी केले व आभार श्रीमती छाया जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here