जामखेड न्युज – – – –
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर संस्थेस महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेल्या अल्प मुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू करण्यास शासनाच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
ADVERTISEMENT

पदवीत्तोर डीएमएलटी(प्रयोग शाळा तंत्रज्ञ), एक्स रे टेक्निशियन (क्षय किरण तंत्रज्ञ) व सोनोग्राफी टेक्निशियन हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी दिली आहे.
सदर अभ्यासक्रम हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेशी संलग्न असून वैद्यकीय व्यवसायासाठी अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अनेक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार असून आपले व्यवसाय सुरू करता येणार आहेत.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या शैक्षणिक संकुलात नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्यात आलेले असुन या महाविद्यालयात व्यवसायाभिमुख शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षां मोरे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागाने नुकताच शासन निर्णय निर्गमित केला असून संपूर्ण राज्यात रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेसह इतर 126 संस्थाना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेल्या अल्प मुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.