जामखेड न्युज – – –
तालुक्यातील खर्डा येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्यां ज्योतीताई गोलेकर यांची अहमदनगर जिल्हा महिला व बालविकास समितीच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

जामखेड तालुका महिला काँग्रेसच्या माध्यमातून त्या महिला संघटन व विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांना निवडीचे पत्र महिला व बालविकास अधिकारी बारूडकर यांनी नुकतेच दिले.
त्यांच्या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोलेकर, ज्ञानेश्वर थोरात, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.