जामखेड न्युज – – – –
नेवासा येथील लिलावती गोविंदराव झावरे पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या त्या भाची तर पत्रकार दौलतराव झावरे पाटील व अँड भैय्यासाहेब झावरे पाटील यांच्या त्या मातोश्री व सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव झावरे पाटील यांच्या त्या पत्नी होत.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या फुपुसाच्या आजाराने आजारी होत्या. 2005पासून त्यांच्यावर नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.