जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
महाराष्ट्र शासनच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवणे सुलभ व्हावे आणि त्यातून शासनाला महसूल वसुली व्हावी या अनुषंगाने ७/१२ सदरी ज्या ठिकाणी भोगवटदार वर्ग २ असे नमूद आहे त्या जमिनी नजराणा भरून वर्ग १ करण्याबाबत धोरण राबविण्यात येत आहे. शासनाच्या या योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 

शासन निर्णय ९ जुलै २००२ नुसार इनाम वर्ग जमिनी भोगवटदार वर्ग २ म्हणून वाटप करण्यात आलेल्या
होत्या .या जमिनीवर शासनाने वेगवेगळ्या अटी आणि शर्ती टाकून त्या वाटप केलेल्या होत्या. जमीन भोगवटदार वर्ग २ असल्याने य जमिनी खरेदी विक्री, हस्तांतरण ,गहाणखत, भाडेपट्टा, आणि इतर कोणतेही व्यवहार करता येत नव्हते. तसेच सदर जमिनीवर कर्ज मिळण्यासाठी सुद्धा
अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने ९ जुलै २००२ रोजी परिपत्रक काढून यामध्ये सुधारणा केली आणि या जमिनी भोगवटदार वर्ग १ करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.
ADVERTISEMENT 

सदर जमिनीमध्ये पाटील इनाम,कुलकर्णी देशमुख इनाम यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये देवस्थान इनाम आणि गाव मुलकी कामगार वतन म्हणजेच महार वतन ,
रामोशी वतन यासाठी शासनाने निबंध तसेच ठेवले असून त्याबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने सदर जमिनींचे व्यवहार करता येतील.
ADVERTISEMENT 

सदर जमिनीमध्ये पाटील इनाम,कुलकर्णी देशमुख इनाम भोगवटदार वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्याची प्रक्रिया तहसील स्तरावरील असून यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या रकमेच्या ५०% रक्कम शासनाला नजराणा म्हणून भरने
आवश्यक राहील. त्यानंतर या जमिनी भोगवटदार वर्ग १ म्हणून देण्यात येतील. सदर जमिनी भोगवटदार वर्ग १ झाल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकाराचे शासकीय निर्बंध राहणार नाही
ADVERTISEMENT 

म्हणजेच आपल्याला जमिनीची खरेदी विक्री, हस्तांतरण, गहाणखत, भाडेपट्टा, आणि इतर कोणतेही व्यवहार करता येतील. त्यामुळे सदर शासकीय योजनेचा जामखेड मधील जास्तीत जास्त शेतकर्यांनी फायदा घ्यावा असे महसूल प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.








