भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गुलाब खरात व युवा नेते नंदु खरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणसिंह होळकर यांच्या उपस्थितीत संपन्न

0
329
जामखेड न्युज – – – – 
 मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष मा ना प्रा राम शिंदे साहेब यांचे कटटर समर्थक तथा जामखेड भाजपा चे ता उपाध्यक्ष मा पै. गुलाब भाऊ खरात व मा पै. नंदू आबा खरात (युवा नेते) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
                        ADVERTISEMENT
या स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंंडी येथून झाला तर बक्षीस वितरण सोहळा हाळगाव येथे संपन्न झाला.
                   ADVERTISEMENT
या स्पर्धेसाठी सोलापूर अहमदनगर उस्मानाबाद बीड व पुणे या ठिकाणाहून बहुसंख्य  स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या  स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विक्रम बोरुडे या फॉर्च्यूनर डिफेन्स अकॅडमी जामखेड च्या विद्यार्थ्यांनी पटकावला व मुलींमधील प्रथम क्रमांक. अक्षता दिंडे योद्धा करिअर ॲकॅडमी खडकत या विद्यार्थिनींनी पटकावला.
                            ADVERTISEMENT
 
या स्पर्धेच्या वेळी जि. प. सदस्य मा सोमनाथजी पाचरणे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मा तालुकाध्यक्ष विकास दादा मासाळ. भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा पै शरद दादा कार्ले, मा संभाजी खरात (ग्रामसेवक), युवामोर्चा ता उपाध्यक्ष मा वस्ताद बाबासाहेब महानवर.  मा दादा पुराणे,मा ज्ञानदेव ढवळे, रासपा कर्जत जामखेड विधान सभा प्रमुख मा डॉ. प्रकाश कारंडे, मा विशाल भांडवलकर,तसेच  ग्रामस्थ व  युवक बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रा. प्रविण वाघमोडे (फॉर्च्यूनर डिफेन्स अकॅडमी जामखेड) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
                        ADVERTISEMENT 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here