जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल मदारी वस्ती, कुरेशी गल्ली, बंगला गल्ली, बागवान गल्ली, कसबा गल्ली येथे मुस्लिम समाजाचे प्रबोधन करून त्यांच्या मनातील लसीकरणा बद्दल असलेले गैरसमज दूर करून त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे खर्डा गावातील मुस्लिम समाजातील 260 नागरिकांचे लसीकरण करण्यास प्रशासन यशस्वी झाले.
ADVERTISEMENT 

यावेळी मदारी वस्तीत लसीकरण करण्यासाठी अॅड डॉ. अरुण जाधव यांनी सहकार्य केले. तसेच मुस्लिम समाजातील महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी व त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी खर्डा गावातील ग्रामसंघ आणि बचत गटाच्या महिलांनी मोलाची भूमिका बजावली. आज पर्यंत खर्डा गावातील मुस्लिम समाजात लसीकरणा बद्दल नकारात्मक मानसिकता होती असे बोलले जात होते परंतु प्रशासनाने त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांचे लसीकरण करण्यात आले. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सकाळी आठ वाजता मुस्लिम समाजातील घराघरात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. याचा परिपाक म्हणून मुस्लिम समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने लसीकरणासाठी तयार झाले.
ADVERTISEMENT 

यावेळी यांच्यासोबत मदन पाटील, श्रीकांत लोखंडे, युवराज ढेरे पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच बरोबर तालुक्यातील 23 गावात एकाच वेळी लसीकरण सुरू करण्यात आले होते. पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना तीन-चार गावासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच ग्रामसेवक, सरपंच, आशा, बचत गट महिला, CRP यांच्या सहकार्याने तालुक्यामध्ये तेराशे च्या वर लसीकरण एका दिवसांमध्ये करण्यात प्रशासन यशस्वी ठरले. यावेळी पंचायत समितीमधील सहाय्यक गट विकास अधिकारी दयानंद पवार, कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्ताराधिकारी माने, साळवे, कैलास खैरे, भजनावळे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरुडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.