चिकाटी व नियोजनबद्ध अभ्यासामुळेच यश मिळते – प्रा. मधुकर राळेभात

0
264
जामखेड प्रतिनिधी 
                    जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
कठोर परिश्रम, योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, उजळणी आणि मानसिकदृष्ट्या कणखरपणा ही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे. आपण ग्रामीण भागातील असलो तरी योग्य नियोजन केले तर यश हमखास मिळते स्वतःची क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवा. हाच दृष्टिकोन ठेवून चिकाटी व अभ्यासामुळेच यश साकार होते असे मत प्रा मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
     रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार तसेच पत्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुदाम वराट यांचा सत्कार व आईचे ऋण फेडण्यासाठी मुलगी आशाताई वराडे यांची इच्छा पत्रकार प्रकाश खंडागळे यांनी शाळेसाठी देणगी देऊन पुर्ण केली याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधुकर राळेभात होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश भोसले, नगरसेवक दिंगाबर चव्हाण, अमित जाधव, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम चौधरी, नागेशचे प्राचार्य भगवानराव मडके, पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे, सुनिल वारे, मयुर भोसले, पत्रकार सुदाम वराट, प्रकाश खंडागळे, लियाकत शेख, गुरूकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे, शारदा बोळे, विलास पवार, मोहन यादव, सुग्रीव ठाकरे, सचिन डोईफोडे यांच्या सह सर्व शिक्षक विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
       महाराष्ट्र टॅलेंट सर्च एमटीएस परिक्षेत कन्या विद्यालयाच्या एकुण ४२ विद्यार्थीनी बसल्या होत्या त्यापैकी ३५ पास झाल्या यातील पाच विद्यार्थीनींचा गुणवत्ता यादीत समावेश झाला यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या पुढीलप्रमाणे आहेत.
बहिर काजल दिलीप, लगड संपदा संतोष, 
साळुंखे प्राजक्ता चंद्रकांत, जगदाळे प्रियंका बाबासाहेब 
धुमाळ श्वेता किशोर, एमटीएस प्रमुख बाळकृष्ण देशमुख, 
  या पाचही गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. 
   आपल्या आईचे ऋण फेडणारी मुलगी आशालता रामलिंग वराडे!  
    आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ आशाताई वराडे यांनी शाळेसाठी देणगी देण्याचे ठरवले होते पण दुर्दैवाने आशाताई यांचे निधन झाले त्यामुळे त्यांची इच्छा पत्रकार प्रकाश खंडागळे यांनी आज निधी देत त्यांची इच्छा पुर्ण केली.  निधी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडे प्रदान केला. 
     तसेच मराठी साहित्य प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सुदाम वराट यांचा सत्कार करण्यात आला 
   यावेळी बोलताना मधुकर राळेभात यांनी सांगितले की, आयुष्यात नेहमी उच्च ध्येय ठेवा त्यादृष्टीने प्रयत्न करा यश हमखास मिळेल. असे सांगितले तसेच यशस्वी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
शाळेला देणगी दिल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रकाश खंडागळे यांना अश्रू अनावर झाले. 
आपल्या आईचे ऋण फेडणारी मुलगी आशालता रामलिंग वराडे!
आपल्या जामखेड शहरातच लहानशीमोठी झालेली, आशालता रामलिंग वराडे ही कांताबाई रामलिंग वराडे यांची मुलगी. गर्भधारणेची पिशवी नसल्याने तिचे लग्न होऊ शकले नाही. पण तिने या व्यंगावर मात करीत आई वडिलांचा सांभाळ केला. आईच्या मालकीच्या जागेत प्रितम लेडीज शाॅपीचा व्यवसाय केला. विशेष कार्यकारी दंडाधिकारी असताना जनतेची सेवा केली. महिलांना मार्गदर्शन केले. तसेच धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. 2 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांचे मातृत्वाचा आधारवड कोसळला. त्यानंतर ही त्या जिद्दीने जीवणसंधर्ष करत असता दि 1 मे 2021 रोजी आशालता रामलिंग वराडे यांचे ह्रदय विकारांच्या झटक्याने निधन झाले. मागील 2 नोव्हेंबर रोजी आपल्या आईचे ऋण फेडण्यासाठी नागेश कन्या शाळेला तिच्या स्मरणार्थ काही दान करावे असे तिचे स्वप्न होते. ते आज पुरे होत आहे याचा आनंद आहे.
मी मा श्री सरसमकर सर यांना आशालता यांचे अधूरे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी कांताबाई रामलिंग शंकर वराडे यांच्या स्मृतीदिना निमित्ताने दान करण्याची इच्छा प्रगट केली आणि त्यांनी मग आजचा हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल प्रकाश खंडागळे पत्रकार सर्वांचे मनापासून आभार मानले.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष सरसमकर तर आभार प्रकाश सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here