जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तर्फे प्रतीवर्षी प्रमाणे होणारी किल्ले बनवा स्पर्धा या ही वर्षी मोठ्या उत्साहात जामखेड मध्ये साजरी होणार आहे. या ही वर्षी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे अहवान पांडुराजे भोसलेनी केले आहे.
दिवाळी म्हटले की शाळेला सुट्या फटाक्यांची आतिषबाजी, नवे कपडे व गोड धोड खाऊ यातच रममान न होता मुलांना खऱ्या इतिहासाची ओळख व्हावी आपल्याला मिळालेल स्वराज्य हे श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज व असंख्य मावळे यांच्या बलिदानामुळे मिळालेल आहे हे मुलांना कळावे यासाठी या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन प्रतीवर्षी केले जाते. स्पर्धेच्या मध्यामातुन लहान मुलांना देश प्रेम धर्म प्रेमाचे जनु बाळकडुच दिले जाते. किल्ला बनवण्यासाठी मुले इतिहासाची पाने वाचुन माहीती घेऊन मग किल्ला बनवतात त्यामुळे त्याच्यामध्ये इतिहासाची आवड निर्माण होऊन मुलांमध्ये देश प्रेम निर्माण होते आपला इतिहास वाचुन आत्मसात करून आचरण केल्याशिवाय हा हिंदुस्थान जागतीक महासत्ता होऊच शकत नाही हीच ताकद युवा पिढीत निर्माण करण्यासाठीच या किल्ले बनवा स्पर्धेचा अट्टहास आहे.
या स्पर्धेतील स्पर्धकाला मिळालेली प्रेरणा व ऊर्जा त्याला पुढील वर्षभर प्रत्येक गोष्टीत त्याला यशस्वी करते. या स्पर्धेच्य माध्यामातून देशाचे उद्याचे शिल्पकार डॉक्टर, इंजीनियर, जवान, सायन्टिस हे देशप्रेमी बनुन देशाचे नाव ऊंच करतात गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून उद्याची पिढी ही निर्व्यसनी, बलशाली, बुध्दीमान व देशप्रेमी निर्माण व्हावी व त्यांच्याकडून या देशाची सेवा घडावी यासाठीच ही स्पर्धाचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड चे प्रमुख श्री पांडुराजे मधुकर भोसले हे दरवर्षी करत असतात