जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट)
नगर जिल्हा वुशु संघटना व जामखेड पोलीस स्टेशन च्या वतीने जामखेड येथे आयडियल स्पोर्टस् अकॅडमी जामखेड येथील खेळाडूंचा राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.
वर्धा येथे नुकत्याच राज्यस्तरीय वुशु अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्टस् अकॅडमी जामखेडचे खेळाडू रोहित थोरात व यश जाधव यांनी सुवर्णपदक मिळविले व त्यांची जालिंदर पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तसेच कृष्णा वनवे, संदीप जायभाय, आदित्य जायभाय यांनी कांस्यपदक मिळविले.
या सत्कार कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, अकॅडमीचे अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात, नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले, उपाध्यक्ष प्रशिक्षक शाम पंडित व खेळाडूंचे पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.






